PUNE CITY NEWS :- अक्षय बोराडे ला समर्थन देणाऱ्या विशाखाताई गायकवाड यांचा मारहाण प्रकरणा बाबत आपल्या फेसबुक पेज वर खुलासा केला
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2600910273456899&id=100006138546968
नमस्कार !!!!
मागील ४/५ दिवस घड़लेल्या प्रकाराचे उत्तर व खुलासा?
१) मी फ़क़्त महाराजांचे नाव घेवून अडचणीत आलेल्या मुलाला मदतीला गेले होते.
२)जाण्यापूर्वी सत्यशील शेरकर यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होवू शकला नाही.
३)तिथे गेल्यावर अक्षयची गड़बड़ बघून सर्व प्रकार लक्षात आला होता परंतु लाखो शिवभक्तांना अचानक मी सांगणे रुचले नसते,म्हणून फ़क़्त गुन्हा दाखल करून तिथे पाठिंबा दयायला जाणारे शिवभक्त,शिरोलीचे ग्रामस्थ व पोलीस यांचा विचार करून या नाट्यावर तातपुरता का होईना पडदा पाडणे गरजेचे होते.
४) मी खोट नाही सहन करू शकत म्हणून ख़ुप धाड़साने 30 में ला रात्री जनता न्यूज च्या पेजवर Live जो 1hrs आणि 24mins चा होता,त्यात अनेकांचे डोळे उघडण्याचा प्रामाणिक प्रयत्न तटस्थ राहून केला आणि अनेक शिवभक्तांना त्यातील खरा प्रकार बऱ्याचअंशी समजला.
एका भीम कन्येन शिवभक्ताला खोटा आहे दाखवून देताना मोठा चैलेंज होता व मनावर ताण ही होता.
५) हा live संपताच अक्षय ने मला संपर्क करून वाद घातला व धमकीवजा भाषा वापरली आणि लगेच स्वताची सफाई देण्यासाठी केविलवाना प्रयत्न करत live करून काही फ़ोल पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. आपल्या Live ला follower आणि Share कमी झाल्याचे त्याला आढळून आले व त्याने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर मीटिंग करून प्रकरण मिटवले.
६)या सर्व प्रकारात त्याला कधीच कोणी दबाव आणला नाही उलट महाराजांचे नाव घेवून भावनिक आवाहन करून इतके मावळे गावात बोलावून यानेच आपला ग़ैरवापर करत गावाला वेठीस धरले.
७) हजारों लाखों मावळे याला पाठिंबा देवून तू दबाव घेवू नको हा विश्वास दयायला कमी पडले.
एकूणच अक्षय बोराडे खोट बोलला, त्याने महाराजांची खोटी शपथ घेतली आणि त्याला मारहाण झालीच नव्हती- त्याचा स्वताचा तसा फिर्याद देताना जबाब आहे. तो तमाम शिवभक्तांचा आणि महाराजांचा अपराधी आहे.कथित गरीब असणारा मुलगा हा अजिबात अन्याय व दबाव सहन करणारा नाही,योग्य वेळी माझ्याशी त्याने केलेले संभाषण मी नक्की समोर आनेल.
दरम्यान मी कळत नकळत खासदार डॉ अमोल कोल्हे व शिवभक्त सत्यशील शेरकर यांच्या बदनामीला कारणीभूत ठरले यासाठी या दोघांची व त्यांच्या सर्व समर्थकांची जाहिर माफी मागते.
या प्रकरणातून सर्वांनी एकच बोध घ्यावा सोशल मिडियावर महापुरुषांच्या नावाने आवाहन करणारे सर्वच खरे असतातच असे नाही,सत्यता पाहणे ख़ुप गरजेचे असते.आणि अशी चूक कोणी करेल त्यांना……”सुट्टी नाही”☝️???
जवळपास सर्व प्रकरण आता सर्वाना नीट समजले असे मी मानते व यापुढे याविषयी परत कोणी मला खर/खोटे काय हे विचारायला कॉल/ मेसेज कृपया करू नये. शिवभक्तांच्या भावना दुःखल्याचा राग नक्की आहे पण मी माझे कर्तव्य १०००℅ प्रामाणिकपणे पार पाडल्याचे मला आत्मिक समाधान आहे कारणी यांच्या मांडवलीमधे मी सहभागी नव्हते व मला याची कल्पनाही नव्हती.
भविष्यात अशा भोंदू मुलांनी महाराजांचे नाव घेवू नये व आपल्या छाताडावर भारतमातेचा Symbol पण लावू नये ही मनस्वी ईच्छा??
जय हिंद जय महाराष्ट्र
जय शिवराय जय भीम??
धन्यवाद !!
आपली नम्र,
सौ विशाखा गायकवाड़
प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता
कट्टर मनसैनिक

