पुणे

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात लस देऊन झाला शुभारंभ

भारतीय कंपनीची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने तयार केलेल्या “कोविशिल्ड” लसीचा पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात शुभारंभ झाला.

78 वर्षीय डॉ. विनोद शहा यांना सकाळी 11 वाजता लस देऊन कोरोना लसीचा प्रारंभ करण्यात आला.

या लसीकरण प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती रूबल अग्रवाल, आरोग्य विभाग प्रमुख डॉ.आशिष भारती यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, डॉक्टर, नर्सेस आणि अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका आणि खासगी मिळून 8 रुग्णालयांमध्ये 800 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाला सुरूवात झाली आहे.

पुण्यात महत्वाच्या आठ रुग्णालयांमध्ये हे लसीकरण करण्यात येत असून टप्याटप्प्याने ही लस सर्वांना देण्यात येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

फेसबुक – https://www.facebook.com/100328258255873/posts/227882608833770

 

Related posts

आर्थिक मदतीसाठी सरसावलेले हात कोरोना योद्धाच: पाटील

Vishal Khandagale

पुण्यातील ‘रेमडीसीविर’चा तुटवडा दूर करा : महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX