पुणेमहाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

PUNE CITY NEWS :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरुवारी) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यात वाढता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार असून त्यात संपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेला आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विशेष मानला जात आहे.

Related posts

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Vishal Khandagale

मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी : प्रकाश जावडेकर

Vishal Khandagale

शहरात दिवसभरात २९८ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.