कोरोनागुन्हे विषयकपुणे

संचारबंदी चे आदेश: पुणे पोलीस

Pune City News:- कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव मुळे
पुणेकरांना आता पूर्णवेळ घरातच थांबावं लागणार आहे. पुणेकरांना वाहनेही बाहेर काढता येणार नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक थांबणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह, ओला, उबर अशा सेवाही बंद. नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील नागरी भागांत संचारबंदी सुरू. लोकांनी संचारबंदी पूर्णपणे मनावर घेतल्याने पोलिसांना हे पाऊल उचलावं लागत असल्याचं दिसत आहे.दरम्यान, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी संचारबंदीचा आदेश रविवारी रात्रीच काढला होता. त्यामध्ये कोणत्याही कारणासाठी नागरीकांना शहरामध्ये फिरता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Related posts

येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन

Vishal Khandagale

हरणाच्या शिंगाची तस्करी; दत्तवाडी पोलिसांची कारवाई

Vishal Khandagale

कोरोना : पुण्यातील भोजनालयाला व रेशन वाटप केंद्राला भेटी : राज्यमंत्री विश्वजीत कदम

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX