Pune City News
पिपरी चिंचवड

शेकडो वाहनांवर कारवाई…

Pune City News :- राज्य सरकारच्या आदेश न जुमानता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. गुरुवार (२) रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सुमारे १०१ वाहनांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस कार्यालयाकडून देण्यात आली.

सध्या संपूर्ण भारतात लॉक डाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा सोडल्यातर कोणतीही यंत्रणा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक नागरिक अडकून ओढले आहेत.

सरकारकडून घरा बाहेर पडू नका असे आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर येताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. पोलीस नागरिकांना धडा शिकवण्यासाठी लाठीचा वापर करत आहेत.नागरिकांच्या भावना समजून न घेता त्यांना दिला जाणारा मार यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी रोषाची भावना निर्माण होऊ लागल्याचे प्रत्यक्षदर्शींने सांगितले.

Related posts

आकुर्डी भरदिवसा खून!

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवड येथील कोरोनास्थितीचा शरद पवार यांनी घेतला आढावा

Vishal Khandagale

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी’ करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment