Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक जाहीर !

PUNE CITY NEWS :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षांसाठी दि. 1 जून 2020 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख दि. 30 जून आहे. कोरोना’ महामारी  मुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या होत्या . व त्याचे नियोजन सुरू असतानाच आता पुढील वर्षाचे नियोजनही करावे लागत आहे. पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह देश, विदेशातील विद्यार्थी परीक्षा देतात.

पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. त्याचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये शुल्क तर मागासप्रवर्ग गटातील विद्यार्थ्यांसाठी 350 रुपये शुल्क आहे. विद्यार्थ्यांना शुल्क ऑनलाईनच भरावे लागणार आहे.

पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे 77 विभाग आहेत. त्यांच्यासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना मागील वर्षाची उत्तीर्णतेची गुणपत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र याचे फोटोकॉपी अपलोड करावी लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

प्रवेश परीक्षेसाठी लिंक –
https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx

Related posts

कोरोनाला रोखण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार होणार ‘चौकीदार’ : गिरीश बापट

Vishal Khandagale

अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करा : मंत्री अनिल परब

Vishal Khandagale

बोपोडी – गोदाई सोशल फाउंडेशन कडून शिधा वाटप !

Leave a Comment