PUNE CITY NEWS :- पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 818 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 54 हजार 274 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 934 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 60 हजार 455 रुग्णांपैकी 1 लाख 23 हजार 595 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 63 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.3 टक्के आहे.

