पुणे

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण

JAGDISH

पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे.

मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मात्र तुमच्या सर्वांच्या सहकार्याने लवकरच तुमच्या सेवेसाठी रुजू होईल.असे ट्विट मुळीक यांनी केले आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यात सामान्यांबरोबरच लोकप्रतिनिधींना ही कोरोनाने ग्रासले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापासून सर्वांनाच कोरोनाने ग्रासले आहे.

आता पर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्यासह नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी वेळीच उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे.

आता भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन मुळीक यांनी केली आहे.

Related posts

पुण्यातील तीन मित्रांनी दिला 1100 विद्यार्थ्यांना आधार !

Vishal Khandagale

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली सिरम इन्स्ट्यिट्यूटला भेट

Vishal Khandagale

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX