Uncategorized

डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

dr nilam gorhe

उत्तर प्रदेश हाथरस येथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी शनिवारी( दि.३) त्या हाथरस येथे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या.

या दरम्यान उत्तरप्रदेश पोलीस प्रशासनाने त्यांना थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यातील एक पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने गांधी यांच्या अक्षरशः कुर्ता पकडून ओढले.

याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती यांनी खेद व्यक्त केला. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.

बंदोबस्त दरम्यान महिला पोलीस या ठिकाणी असणे आवश्यक होते. परंतु असे झाले नाही असा प्रश्न देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सदरील पत्रात प्रश्न उपस्थित केला आहे.

या कुटुंबाला उत्तर पोलीसांचे सहकार्य लाभत नाही. परिणामी हे सर्व प्रकरण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणारे असल्याने या कुटूंबाला केंद्रीय पोलिसांचे संरक्षण देण्यासाठी देखील विचार व्हावा असे देखील पत्रात म्हटले आहे.

याघटनेत ज्याज्या अधिकारी यांच्याकडून दिरंगाई झाली किंवा ज्यांनी संवेदनहीनतेने काम केलं त्यांच्यावर कारवाई व्हावीच त्याचबरोबर एक महिन्याच्या आत या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related posts

मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य

Vishal Khandagale

चंदननगरमध्ये 14.78 लाखांच्या सोन्याच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी अटकेत;

Vishal Khandagale

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX