गदिमा हे पुणेकरांसाठी एक अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आत्मीयतेचे होते. त्यांचे स्मारक पुण्यामध्ये असावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी त्यांचे चाहते, प्रेमी आणि कुटुंबांची पण होती. गेली दोन वर्षे स्मारकाची तयारी पुणे महानगरपालिकेकडून सुरू होती.
कोथरूडमध्ये महात्मा सोसायटी येथे महापालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या ‘एक्झिबिशन सेंटर’ या साडे सहा एकर जागेमध्ये अनेक प्रकल्प होत आहेत. त्याठिकाणी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमा स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
यामध्ये गदिमा स्मारकामध्ये त्यांचा जीवनप्रवास आणि साहित्याची समग्र माहिती देणारे दालन, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन, डिजिटल दालन, सभागृह आणि व्यवस्थापन कक्ष अशी पाच दालने करण्यात येणार आहेत. या निमित्ताने गदिमांच्या स्मृती जतन तर होतीलच पण हे स्मारक प्रेरणादायी देखील असणार आहे.
पुणे महापालिकेने गदिमाच्या स्मारकासाठी चांगल्या प्रकाराची जागा उपलब्ध करून देणे, निधीची उपलब्धता करून देणे, सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पूर्ण करणे हे सगळे कामे पूर्ण झाली आहेत. गदिमाच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने पुणेकरांच्या वतीने ही एक आदरांजली असणार आहे.
त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी एक अद्यावत दालन स्मारक पुण्यामधे उभारत आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात साडे आठ कोटी रुपयांच्या आर्थिक निधीला मान्यता मिळाली असून आता स्मारकाच्या कामाला वेग येणार आहे. लवकरच एक कामाचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे.

