Pune City News
महाराष्ट्र

निवडणूक जिंकल्याने पत्नीने पतीला खांद्यावर उचलून घेऊन काढली मिरवणूक

खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळू गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवाराचा दणदणीत पराभव केला.

संतोष यांच्या या विजयानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगणाला भिडला आणि तिने चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढत जल्लोष केला.

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजयी उमेदवाराला त्याचे चाहते, कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात खांद्यावर घेऊन मिरवणूक काढताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल.

पण पती निवडून आला म्हणून पत्नीने खांद्यावर उचलून मिरवणूक काढली, अशी घटना तुम्ही आजपर्यंत ऐकली नसेलच.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक काढणे, गुलाल उधळणे व गर्दी करणे, यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निर्बंध घालण्यात आले होते.

त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना रेणुका गुरव यांनी आपले पती संतोष यांना खांद्यावर घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत गावांमध्ये फेरी मारली.

Related posts

…तरच मी कंगनाची माफी मागेल- संजय राऊत

Vishal Khandagale

सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी !

Vishal Khandagale

राज्य पहिल्या क्रमांकाचे कसे होईल हेच ध्येय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment