Pune City News
पुणे

कोरोना संसर्ग आढावा बैठकीत महापौरांनी मांडलेले मुद्दे…

आज पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत च्या  बैठकी मध्ये शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खालील मुद्दे मांडले
■ सरकारी RT-PCR ची टेस्टिंग क्षमता केवळ १२०० इतकीच असून यामुळे नवे कोरोनाबाधित वाढूनही चाचण्यांची संख्या वाढवता येणे शक्य होत नाही. परिणामी संसर्ग वाढण्यास मदतच होत आहे. १२०० पेक्षा जास्त टेस्ट सरकारी पातळीवर केल्या जात नाहीत. त्यामुळे सरकारी RT-PCR टेस्ट क्षमता तातडीने वाढवावी. या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. अपेक्षा करूयात यावर तातडीनं पावले उचलली जातील. अन्यथा पहिल्या लाटेप्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ शकते.
■ लसीकरणाच्या बाबतीत वेग येणे आवश्यक आहे. शहरात जवळपास सरकारी १०० आणि खासगी ८०० दवाखाने आहेत. याबाबतीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने चर्चा करुन लसीकरण केंद्र वाढवण्यासंदर्भात तातडीनं चर्चा करावी. जेणे करुन दररोज ४० ते ५० हजार लाभार्थ्यांना लस देणे शक्य होईल. असे झाल्यास दोन महिन्यातच शहरातील लसीकरण पूर्ण होऊ शकेल.
■ खासगी रुग्णालयात कोविडसाठी राखीव असलेले बेड्स आता नॉन कोविड केले आहेत. असे बेड्स पुन्हा कोविड उपचारांसाठी उपलब्ध करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावेत.
■ कोरोना काळात जबाबदारीने भूमिका निभावणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांना ‘फ्रंट लाईन वर्कर्स’च्या टप्प्यात लस देण्यात यावी.

Related posts

सुवर्णयुग सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता ११ लाख रुपयांची मदत

Vishal Khandagale

आमदार सुनिल टिंगरें कडून ५० लाखांचा निधी !

Vishal Khandagale

करोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करा : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

Leave a Comment