Pune City News
पुणे

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रा

पुणे, दिनांक १२ – भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ येथील आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रेने (हेरिटेज वॉक )करण्यारत आला. हरियाणा सरकारच्याअ आर्थिक आयोगाचे सल्ला गार मदन मोहन गोयल, आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय पुरातत्वह विभागाचे राजेंद्र यादव, राजेश पांडे, नेहरु युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी आमदार जगदीश मुळीक, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, नीलम महाजन आदी उपस्थित होते.
भारतीय पुरातत्वी विभाग, सांस्कृ्तिक मंत्रालय, नेहरु युवा केंद्र, राष्ट्री य सेवा योजना, जिल्हा धिकारी कार्यालय यांच्याभ संयुक्तम विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ पदयात्रेचे आयोजन करण्यापत आले होते. पदयात्रा आगाखान पॅलेस, शांतीनगर चौक, एअरपोर्ट रोड (अंडरग्राऊंड ब्रीज), मोरिगा शॉपी, हयात हॉटेल, नगर रोड, आगाखान पॅलेस या मार्गावरुन काढण्याडत आली. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यापत आले होते. प्रारंभी नेहरु युवा केंद्राचे जिल्हाॅ युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी प्रास्तापविक केले.
हरियाणा सरकारच्याा आर्थिक आयोगाचे सल्लाेगार मदन मोहन गोयल यांनी देशाला राजकीय स्वाॅतंत्र्य मिळाले तथापि, प्रत्येयकाला आर्थिक स्वाातंत्र्य मिळण्या ची गरज प्रतिपादन केली. स्वाततंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना त्यांानी आदरांजली अर्पण केली. यावेळी आमदार तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सर्वांना शुभेच्छाि देवून भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याीचे आवाहन केले. पदयात्रेत राष्ट्रीयय सेवा योजनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
0000

Related posts

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याच्या सूचना

Vishal Khandagale

गरज पडली तर पुण्यातही “जनता कर्फ्यु” लागू करा: अजित पवार यांच्या सूचना

Vishal Khandagale

महानगरपालिका निवडणुकीत ५० ते ६० नगरसेवकांचे लक्ष्य : मनसे

Vishal Khandagale

Leave a Comment