पुणे शहर

ससूनचे किमान ६० टक्के बेड्स तरी कोविडसाठी राखीव ठेवा-महापौर

पुणे शहर – ससून रुग्णालयात एकूण बेड्सची संख्या १ हजार ७५० इतकी आहे. मात्र असं असतानाही कोरोनासाठी केवळ ५२० बेड्स ससूनने उपलब्ध केले आहेत. एकीकडे शहरातील सर्व रुग्णालयांचे ८०% बेड्स कोविडसाठी राखीव ठेवले असताना ससूनमध्ये मात्र ही टक्केवारी अत्यंत कमी आहे. म्हणूनच ससूनमध्ये किमान ६० टक्के बेड्स तरी राखीव ठेवावेत, या संदर्भात आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी चर्चा केली.

खाजगी लॅब पेक्षा सरकारी पातळीवरील RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवावी अशीही मागणी महापौरांनी केली आहे. ते म्हणाले,’ शहरात दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होत असल्या, तरी त्यातील सरकारी पातळीवरील RT-PCR चाचण्यांची संख्या केवळ २ हजारांच्या आसपास आहे. ही संख्या तातडीने वाढवावी, यासाठी गेली अनेक दिवस आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. यासंदर्भात डॉ. तांबे यांच्याकडे तातडीने ही क्षमता वाढविण्यासाठी चर्चा केली. सरासरी २५ हजार पैकी २३ हजार चाचण्या या खाजगी लॅबमधून होत असल्याने संसर्गाची भीती जास्त आहे. कारण खाजगी लॅबमध्ये टेस्टिंग केल्यावर संबंधित रुग्ण संबंधित व्यक्ती विलगीकणात राहीलच असे नाही, त्यामुळेच संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

ससून रुग्णालयात PMCares च्या माध्यमातून एकूण ८६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यापैकी ५४ व्हेंटिलेटर सुरू असून ३२ व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे डॉ. तांबे यांच्याकडून सांगण्यात आले, याबाबत चर्चा झाली.आपल्या पुणे महानगरपालिकेला PMCares मधून एकूण ३४ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यापैकी ३३ व्हेंटिलेटर सुरू असून त्याचा वापर उपचारांसाठी केला जात आहे. पुणे महापालिकेला मिळालेले व्हेंटिलेटर सुरु असताना ससूनमधील व्हेंटिलेटर बंद राहण्याचे कारण काय? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे त्याचाही खुलासा लवकर होईल.

Related posts

पुणे विमानतळावरील अत्याधुनिक सुविधांनी युक्त एअरोमॉल पार्किंगचे उद्घाटन

Vishal Khandagale

राज्य शासनाच्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती अध्यक्षपदी विजय डाकले

Vishal Khandagale

राजकीय गुरू रघुनाथ यमुलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.