Pune City News
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

संचारबंदी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात- पुणे व्यापारी महासंघ

पुणे शहर :-  पुणे व्यापारी महासंघाने आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीला विरोध दर्शवला असून या संचारबंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यावरचे स्टॉल सुरू राहणार, रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार, मग हा कसला लॉकडाऊन, असे म्हणत पुणे व्यापारी महासंघाने आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले :-

राज्य सरकारने  संचारबंदीचा जारी केलेला आदेश गोंधळात टाकणारा आहे. यावरून राज्य सरकार आणि प्रशासन संपूर्ण गोंधळ असल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावा अशी व्यापाऱ्यांची मागणी होती. पण, संचारबंदीच्या नावाखाली सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. हा निर्णय घेताना व्यापाऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत देण्यात आली नाही.

संचारबंदीतीत रिक्षा, सार्वजनिक वाहतूक, खाद्यपदार्थांचे स्टॉल, शिवभोजन थाळी यांना सुरू ठेवण्याची परवानगी देता. हे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होईल. मग अशा परिस्थितीत संचारबंदीच्या नियमांचे पालन कसे होईल. कोरोनाचा वाढता संसर्ग कसा रोखला जाईल, असा सवालही रांका यांनी उपस्थित केला.राज्य सरकारच्या या निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध आहे. राज्य सरकारने काढलेला हा देश पूर्णपणे गोंधळात टाकणारा आहे. यातून काय चालू आहे आणि काय बंद आहे हेच कळत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कायदे तज्ञांचा सल्ला घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार सुरू असून

Related posts

पितापुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल: महिलेच्या पोटावर लाथ मारुन घडवून आणला होता गर्भपात

Vishal Khandagale

पुणे शहरात १५० पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

करोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांचे आरोग्य या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे गिरीश खत्री यांच्या वतीने आयोजन..

Vishal Khandagale

Leave a Comment