महाराष्ट्र

टॅक्‍स वाढविण्याचा विचार नाही ; महसूलमंत्री थोरात

“लॉकडाऊनमुळे राज्याचे उत्पन्न घटलेले असले, तरी अद्याप टॅक्‍स वाढविण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”,

अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले :

▪️ देशासह राज्याचे अर्थचक्र कोलमडले आहे. महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक लघुउद्योजकांना सर्वाधिक फटका बसला.

▪️ लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता येत असल्याने व्यापार, उद्योग काहीसे सुरू होऊ लागले आहेत. मुद्रांक विक्री सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात महसुली उत्पन्न सुरू झाले आहे.

▪️ सध्या परिस्थितीत जनतेला कोरोनाच्या कचाट्यातून बाहेर काढायचे आहे. त्याचबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे,” असेही थोरात यांनी सांगितले.

Related posts

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन

Vishal Khandagale

सरकारचा वीजबील बाबत निर्णय!

Vishal Khandagale

50 लाखांच्या खंडणीची मागणी!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX