Pune City News
पिपरी चिंचवड

पोदार इंटरनॅशनल स्कूल ने भरवली व्हर्च्युअल शाळा !

Pune City News :- कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन मध्ये शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता फार कमी असल्याने व कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणुन शाळा बंद असल्या तरी चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये मुलांना घरबसल्या शिक्षण घेता यावे यासाठी व्हर्च्युअल ( व्हिडिओ कॉलिंग) व्दारे…

ई -लर्निग च्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासक्रम घेतला जात आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांनचे शैक्षनिक वर्ष वाया जाऊ नये म्हणुन शाळेचे प्राचार्य शहनाज कोटार यांनी हा उपक्रम राबविला आहे. अशी माहिती दिली. सध्या जगामध्ये कोरोना विषाणू ने थैमान घातले आसुन पुर्ण देशात ताळेबंद (लॉकडाऊन) आसुन त्यामुळे पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड कडून विद्यार्थ्यासाठी घरीच रहा,सुरक्षित रहा असा संदेश देत आहे.व शिक्षक व विद्यार्थी मधील नाते आतुट राहावे म्हणुन यासाठी अभ्यासक्रम घेतला जात आहे. विद्यार्थी व्हर्च्युअल लर्निग द्वारे शाळेचा सगळा अनुभव घेत आहेत तसेच शिक्षक देखिल त्यांच्या विशेष शैलीने विद्यार्थांना मार्गदर्शन करीत आहे. त्यातच विद्यार्थ्यांना आपले शिक्षक व वर्गमित्र यांच्या सोबत संवाद साधला जात आहे. विदयार्थी खेळीमेळीने शिक्षणाचा आनंद घेत आहेत.

Related posts

“रिजनल खिरश्चन सोसायटी” च्या वतीनं गोरगरिबांना मोफत धान्य वाटप !

Vishal Khandagale

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी संवाद साधला

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांची बदली

Vishal Khandagale

Leave a Comment