महाराष्ट्र

बालभारतीकडून दीड लाख पुस्तकांचा पुरवठा !

PUNE CITY NEWS :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार हे सांगणे सध्या तरी अवघड आहे. त्यामुळे बालभारतीकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही  समग्र  शिक्षा अभियानांतर्गत महापालिका व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य अभ्यासमंडळाची पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत.

त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात मनपा शाळा १०५, खाजगी अनुदानित १३५, अश: अनुदानित २१, मनपा माध्यमिक १८ अशा एकूण २७९ शाळांमध्ये १लाख ३९ हजार ७४ पुस्तके वितरीत केली जाणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरु होईल. याबाबत अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत शाळांना पुस्तकांचा पुरवठा केव्हा करणार? या आदेशाची प्रतीक्षा ‘बालभारती’ला लागून होती.

मात्र आता वितरणाचा मार्ग मोकळा झाल्याने महापालिकेच्या केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे तब्बल एक लाख ३९ हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत.

लॉकडाउनला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळा उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे. परंतु, शाळा, महाविद्यालये सुरु होण्यास अजून महिना, दोन महिने अवधी लागणार असल्याचे दिसते.

प्रत्येक वर्षी साधारणत: मे महिन्यात वाटप सुरु होते आणि जूनमध्ये शाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचतात. पण यंदा कोरोनामुळे आता शाळा उशिरा उघडणार असल्याने पाठ्यपुस्तकेही पाठवण्यास उशिर होऊ नये, यासाठी शाळांनी पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांना वाटप करणे आवश्यक आहे. जेणेकरून मुले घरी अभ्यास करू शकतील,  अशी माहिती विषय तज्ज्ञ प्रदीप शिंदे यांनी दिली.

Related posts

राज्यापुढे मोठे संकट; रक्तसाठा घटला

Vishal Khandagale

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

जागतिक महिला दिनानिमित्त रणरागीणी रॅली

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX