Pune City News
महाराष्ट्र

आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या फोनमुळे खळबळ

मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. रात्री पावणेबाराच्या दरम्यान हा निनावी फोन आला होता. यामुळे आमदार निवास तात्काळ रिकामे करण्यात आले आहे.

मुंबईतील आकाशवाणीसमोर असलेले आमदार निवास श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ रिकामे केले.

बॉम्ब शोधक पथकाने रात्रभर प्रत्येक मजल्यावरील रूम चेक केल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून आमदार निवासापासून ५० मीटरपर्यंत बॅरिकेट लावण्यात आले आहेत.

रात्रभर शोधाशोध केल्यानंतर कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू हाती लागली नसल्याने हा निव्वळ कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, हा फोन आला कुठून आणि कुणी केला, याचा पोलीस शोध घेत आहे.

Related posts

संकेत स्थळावरुन होणार विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन

Vishal Khandagale

डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम स्थगित

Vishal Khandagale

राष्ट्रीय क्रमवारीत डी. वाय.पाटील दंत महाविद्यालयाला तिसरे स्थान…

Vishal Khandagale

Leave a Comment