पुण्यातील भुयारी मार्गातील कृषी महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालयात दरम्यान असणाऱ्या १६०० मीटरच्या बोगद्याचे काम सोमवारी( दि.२८)रोजी पूर्ण झाले. पुण्याच्या भुयारी मेट्रो मार्गातील हा महत्वाचा टप्पा पार झाल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
या मार्गामध्ये शिवाजीनगर बसस्थानक, सिव्हिल कोर्ट, फडके हौद, मंडई व स्वारगेट ही पाच महत्वाची स्थानके आहेत. हा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी “टनेल ब्रेक थ्रू” असे म्हटले जाते.
त्यामुळे कृषी महाविद्यालयातून निघालेले टनेल बोरिंग मशीन सिव्हिल कोर्ट परिसरात खोदलेल्या खड्ड्यात दाखल झाले आहे.
कृषी महाविद्यालयातून ३० नोव्हेंबर रोजी निघालेले हे मशीन१० महिन्यांनी शिवाजीनगर न्यायालय येथे दाखल झाले आहे.
या दाखल झालेल्या “टनेल ब्रेक थ्रू” मशीनचे नाव मुठा असे ठेवण्यात आले आहे.

