Pune City News:- देशभर 21 दिवस लागू असणाऱ्या ‘लॉकडाऊन’च्या काळात अन्नधान्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून केंद्र सरकारने अनुदानित धान्याचा कोटा प्रति व्यक्ती 2 किलोवरून 7 किलोपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा देशभरातील 80 कोटी जनतेला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
27 रुपये किलो दर असलेला गहू नागरिकांना 2 रुपये किलो दराने उपलब्ध करून दिला जाईल. तर 32 रुपये किलो दराचा तांदूळ 3 रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे धान्याचे वितरण करण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राकडून आगाऊ धान्य घ्यावे, अशी सूचना राज्यांना करण्यात आल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.
previous post
next post

