Pune City News :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे केवळ कोरोना बाधित रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करण्यात येणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नॉन कोविड रुग्णांवर देखील उपचार करणार आहेत. तसेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हे इतर आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.”अशी माहिती अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे यांनी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य करार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. या करारप्रसंगी वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय अधिष्ठाता डॉ.जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांसह आदी उपस्थित होते.
previous post
next post

