Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा बिनविरोध,अधिकृत घोषणा बाकी

महाराष्ट्र राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असे स्पष्ट झाले आहे.कारण एकही जादा अर्ज आलेला नाही. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 18 मार्चला या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव सातव, भाजपतर्फे उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड आणि शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर या सात जणांव्यतिरीक्त इतर कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या सात जणांची निवड बिनविरोध होईल, असं स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार राज्यसभेसाठी मतदान होऊन निकाल जाहीर होणार होते. त्यामुळे त्याच दिवशी या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Related posts

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

Vishal Khandagale

डॉक्टर अपल्या दारी उपक्रमात घेतला 1220 नागरिकांनी सहभाग !

Vishal Khandagale

पुण्यातील महंमदवाडी परिसरात दहा गायींची कत्तल

Vishal Khandagale

Leave a Comment