Pune City News :- राज्यघटना देशासाठी सर्वोच्च असून संविधान धर्मनिरपेक्ष आहे. मात्र दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी भारतीय संविधानावर ‘गणपती’ ची स्थापना केली आहे. हे निषेधार्य आहे. राज्यघटने प्रमाणे (संविधान) भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे.
धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नाही, कायद्याने सुद्धा ते चुकीचे आहे. असे असताना संविधान हे गणपतीचा पाठ समजून तरडे यांनी भारतीय संविधानाचा वापर केला आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवीण तरडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करावा अशी संभाजी ब्रिगेड ने मागणी केली

