Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

देशातील मृतांचा आकडा 11वर, तामिळनाडूत करोनाचा पहिला बळी

Pune City News :- करोना विषाणू मुळे तामिळनाडूत एकाचा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील करोनामुळे दगावणाऱ्यांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. तामिळनाडूतील मदुराई येथील राजाजी रुग्णालयात या 54 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 23 मार्च रोजी त्याला राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्या आले होते. मात्र त्याने उपचाराला साथ दिली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला मधूमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. त्यामुळे त्याची प्रकृती वारंवार खालावत गेल्याने आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण परदेशातून आला होता, असं सूत्रांनी सांगितलं.
तामिळनाडूत एकूण 18 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आज एकाचा मृत्यू झाला तर एक रुग्ण बरा झाला आहे. या शिवाय देशात करोनाचे एकूण 560 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 11 लोकांचा मृत्यू झाला असून 46 रुग्ण बरे झाले आहेत. देशातली करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालल्याने मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Related posts

पुण्यात बेघरांचे हाल !

Vishal Khandagale

‘चीनबरोबर चर्चा निष्फळ ठरल्यास लष्करी कारवाईचा पर्याय’

Vishal Khandagale

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale

Leave a Comment