Pune City News
Uncategorized

कोरोना : इटलीच्या मदतीला धावून आला क्युबा देश;

Pune City News :- 53 तज्ज्ञ डॉक्टरांच पथक इटलीमध्ये दाखल
सध्याच्या घडीला प्रत्येक देशात कोरोनानं शिरकाव केल्यामुळं क्युबानं रोगराईशी दोन हात करण्याची परंपरा कायम ठेवत, आपलं पथक इटलीला रवाना केलं. क्युबामधील 53 तज्ज्ञ डॉक्टरांच पथक सध्या इटलीमध्ये दाखल झालंय.
क्युबाचे डॉक्टर प्रमुख्यानं रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काम करणार आहेत. क्युबाचे इंटरफेरोन अल्फा-2 बी हे औषध एखाद्याच्या शरिरावर जादू सारखे काम करते, असा दावा करण्यात येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये या औषधाचा वापर केला जातो. हे औषध रुग्णांच्या शरिरातील व्हायरल इऩ्फेक्शन कमी करण्याचे काम करते.
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसनं क्युबामध्येही शिरकाव केलाय. पण, क्युबा या परिस्थितीतही खंबीर आहे. क्युबामध्ये जवळपास एक हजार संशयित रुग्ण असून, 35 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत माहिती आहे. सध्या व्हेनेझुएला, जमैका, निकारगुआ, सुरिनाम, ग्रेनेडा या देशांमध्ये क्युबाची आरोग्य पथके काम करत आहेत.
क्युबाच का?औषधांमधील संशोधन असो किंवा आरोग्य सुविधा, अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेच्या दरम्यान असलेले क्युबा नावाचे छोटेसे बेट हे कायम आघाडीवर राहिले आहे. रोगराईच्या घटनांमध्ये कायम क्युबाने पुढाकार घेऊन आरोग्य सेवेसाठी काम केले आहे. 2017 मध्ये इबोलाची साथ आल्यानंतरही क्युबाच्या आरोग्य पथकानं अफ्रिकेत काम केले होते. एवढेच नव्हे तर, कायम शत्रू राष्ट्र म्हटल्या गेलेल्या अमेरिकेतही क्युबाच्या डॉक्टरांनी आरोग्य सेवा केली आहे.

Related posts

बायबल वर अधारित “दया सागर” मालिका दूरदर्शनवरून प्रसारित करा : रिजनल खिश्चन सोसायटी

Vishal Khandagale

सखोल परीक्षण करून रुग्णांचा दर शून्यावर आणावा; कुणाल कुमार

Vishal Khandagale

शिक्रापूर येथे ४१लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

Vishal Khandagale

Leave a Comment