कोथरूडपुणे शहर

पेट्रोल दरवाढीचे शतक ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध

पुणे शहर :- कोरोना काळात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध असताना राज्यातील जनता त्रस्थ झाली आहे. यातच होत असलेली पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले.

सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड करिष्मा चौकातील कासट पेट्रोल पंप येथे केले गेले.

‘राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. आर्थिक आवक मंदावली असताना पेट्रोल दरवाढीचे चटके देखील सोसावे लागत आहे.

राज्यातील पेट्रोल दरवाढीच्या सेन्चुरीने होरपळलेल्या जनतेकडे मोदी सरकारचे लक्ष आहे का? सर्व सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवत आर्थिक संकटात लोटणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस गिरीश गुरनानी यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी रवी गाडे, ऋषिकेश कडु, निलेश बच्चेवार, राजेश बच्चेवार, कृष्णा पुजारी, संकेत शिंदे, राहुल जमदाडे, प्रकाश नागरे, अमोल गायकवाड, धनंजय शेळके, संदीप बांदल आदी उपस्थित होते

 

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

पुणे शहर युवक काँग्रेस आयोजित “डॉक्टर आपल्या दारी” अभियान 

Vishal Khandagale

पुणे शहर १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, चार गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ निरीक्षकपदी पदोन्नती

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX