Pune City News
खडकवासलापुणे शहर

शहरात २४ तासात वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची आत्महत्या

पुणे शहर :- कात्रज भागात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्यांपैकी एकाचं नाव निरंजन बाळकृष्ण साळुंखे असं आहे तर दुसऱ्याचं नाव पोपट पांडुरंग सलगर असं आहे. यादरम्यान, संबंधित तिसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख समोर आलेली नाही. निरंजन हे एक रिक्षा चालक असून गेल्या काही महिन्यांपासून ते बेरोजगार होते. यादरम्यान, त्यांचा मित्र त्यांच्यासाठी डब्बा घेऊन येत असे. पण दोन दिवस त्यांचा मित्र कामामुळे डब्बा घेऊन आला नाही. सोमवारी दुपारी संबंधित मित्र डब्बा घेऊन आल्यावर त्यांनी निरंजन यांना फासावर पाहीले.

दुसरे व्यक्ती पोपटस सलगर यांची दोन्ही मुले गावाला गेली होती. पत्नी कामाला बाहेर गेली होती. त्यामुळे ते एकटेच घरी होते. त्यांचा मित्र सतत फोन करत होता. मात्र पोपट फोन उचलत नसल्याने मित्र घरी गेल्यावर त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. तसेच संबंधित तिसरा व्यक्ती हा अंदाजे 30 वर्षांचा असून त्यांनी कात्रज डेअरीजवळील मोरेबाग बस स्टॉपजवळ असणाऱ्या टॉयलेटमध्ये आत्महत्या केली आहे.

दरम्यान, अचानक झालेल्या या तीन आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच संबंधित तिसऱ्या व्यक्तीची देखील अद्याप ओळख समोर आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.

Related posts

पुणे शहर युवक कॉग्रेसचे “अन्नछत्र” होणार सुरु !

Vishal Khandagale

प्रभाग निहाय उमेदवार संख्या व सादर आर्ज

Vishal Khandagale

धक्कादायक प्रकार; गोळीबार करत १४ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार

Vishal Khandagale

Leave a Comment