यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात गणेशमंडळाना सूचना दिल्या.
तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनीही तयारी दर्शवून राज्य सरकारचा आदेश मान्य करणार असून कोणताही अडथळा आणला जाणार नसल्याचे आश्वासन दिले.
गणेशोस्तव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात येत आहे.
दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली.

