राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली.
यावेळी त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील रुग्णालयात उपस्थित होत्या.
प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचण्यात आली.
शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.
दरम्यान, देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

