बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी सिनेसृष्टीतील कंपूशाहीमुळे सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला होता.
नुकताच दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला सुशांतची हत्या झाली नसून हे आत्महत्येचे प्रकरण आहे, असा अहवाल सोपवल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सीबीआयने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा अहवाल चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणातील सीबीआय चौकशी अहवालाची महाराष्ट्र सरकार प्रतीक्षा करत आहे. आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पुढील माहिती मिळेपर्यंत यावर भाष्य करणे उचित नाही.
आम्हाला ज्यावेळी अधिकृत माहिती मिळेल, त्यावेळीच आम्ही या प्रकरणावर भाष्य करु.

