गुन्हे विषयक

होमिओपॅथिक क्लिनिकला पुणे महानगरपालिकेचा दणका

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापारी परवाना न घेता राहत्या बिल्डिंगमध्ये आंबेगाव बुद्रुक येथील सुयश शिंदे यांचे ‘आशा क्लिनिक’ व प्रभात रोड वरील डॉ.ओमकार केळकर यांचे ‘होमिओपॅथिक क्लिनिक’ यांनी रेसिडेन्शिअल बिल्डिंगमध्ये महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता सुरू केलेल्या क्लिनिकला पुणे महानगरपालिकेने कायदेशीर नोटीस काढून दणका दिला आहे. ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डाचे सनी निम्हण यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेचा आर्थिक कर बुडणाऱ्या क्लिनिकचा पर्दाफाश झाला आहे.

सध्या पुण्यात अशा कर बुडव्या क्लिनिकचा धंदा हा राजरोसपणे चालला असून महानगरपालिकेचा कर बुडवणाऱ्या व राहत्या बिल्डिंगमध्ये व्यवसाय करून महानगरपालिकेला कोणतेही माहिती न देता व्यवसाय करणाऱ्या क्लिनिकवर कडक कारवाई करून दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी सनी निम्हण यांनी आयुक्तांना केली आहे.

Related posts

पितापुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल: महिलेच्या पोटावर लाथ मारुन घडवून आणला होता गर्भपात

Vishal Khandagale

सांगवीतील “सैराट”प्रकरणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Vishal Khandagale

येरवड्यात किरकोळ वादातून खून

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX