Pune City News
गुन्हे विषयकपुणे

अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर गुन्हा!

पुणे जिह्याच्या मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील जमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभितेने विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ही जमीन विक्री करून 14 जणांची 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल बाबत सविस्तर : याविषयी जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा. गांधीभवन जवळ, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार जयंत रामभाऊ महाळगी, सुजाता जयंत महाळंगी (रा. गिरीवन डोंगरगाव, ता. मुळशी) आणि अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गिरीवन प्रकल्प गत 30 वर्षे व्यवस्थित सुरु आहे. काही जमीन मालकांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करून घेतली असता त्यांना त्यांचा सातबारा उतारा व वहिवाट यात फरक आढळला.
जमिनीची मालकी व वहिवाट या दिवाणी स्वरूपाच्या विषयांमधील फरकांची दूर करता येण्यासाठी जमीन मालकांबरोबर बोलणी सुरु आहे. कोणाचीही फसवणूक करण्याचा गिरीवनचा हेतू नाही, अशी माहिती गिरीवन प्रोजेक्ट मॅनेजमेंटतर्फे दिली आहे.

Related posts

चिंचणी च्या बाबा वर पुणे ग्रामीण पोलिसांकडून कारवाई…..

Vishal Khandagale

पोलिसाच्या आईला कोरोना..

Vishal Khandagale

मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरात पहिल्यांदाच शुकशुकाट….

Vishal Khandagale

Leave a Comment