राष्ट्रीय

क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या पीडित दलित तरुणीचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येते 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

गंभीर जखमी पीडितेवर दिल्लीतील एम्सला रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

नेमके काय घडले होते
हाथरसच्या चांदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरूणीवर गावातीलच 4 नराधमांनी बलात्कार केला.

त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.

आरोपी अटकेत
14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Related posts

फडणवीस कडून अण्णा हजारे यांच्या मनधरणीचे प्रयत्न

Vishal Khandagale

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात !

Vishal Khandagale

दिल्लीतील जामा मशिद 30 जूनपर्यंत बंद!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX