राष्ट्रीय

घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस उचलणार !

Pune City News:- टाळेबंदी(लॉकडाऊन)मध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे.

याच मुद्द्यावरून आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला आहे.अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली.

रेल्वे परिपत्रकानुसार स्थानिक सरकारी अधिकारी सर्व पडताळणी करून मजुरांना तिकिटे देतील आणि त्यांच्याकडून तिकीट भाडे आकारणार आहे.त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Related posts

चिनी “Rapid Antibodi test Kit’s” ऑर्डर रद्द!

Vishal Khandagale

महापौर चषक कॅरम स्पर्धा

Vishal Khandagale

जगन्नाथ पुरी रथ यात्रेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX