Pune City News
कोरोनापुणे शहर

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे शहर :- कोरोनाच्या काळात समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या सर्वांसाठी मदतकार्य आवश्यक आहे आणि आज रोजगार उपलब्ध नसताना व पोटाचा प्रश्न असताना तृतीयपंथी भगिनींना मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन ने दिलेली मदत मोलाची आहे असे गौरावोदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.

मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने तृतीयपंथी भगिनींना किराणा किट व आरोग्य किट वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

केवळ याच काळात नव्हे तर कायमच तृतीयपंथीच्या मदतीसाठी आपण प्रयत्न करू असेही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

तृतीपंथीच्या लसीकरणासाठी आपण प्रयत्नशील असून ज्यांच्याकडे आधार कार्ड वा अन्य पुरावा आहे त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यास डॉ वैशाली जाधव यांनी सहमती दर्शविली आहे मात्र ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही अश्यांच्या लसीकरणाबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी ही संदीप खर्डेकर यांनी केली.

यावेळी क्रियेटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विशाल भेलके, मुकुल माधव फाउंडेशनच्या यास्मिन शेख, योगेश रोकडे इ मान्यवर उपस्थित होते.

Related posts

शिस्त पाळल्यास लॉकडाऊन होणार शिथिल…

Vishal Khandagale

पुणेकरांनी भरला तब्बल १३ कोटी दंड

Vishal Khandagale

शिवाजीनगर येथील मेट्रो बाधितांचा पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment