PUNE CITY NEWS:- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने आता स्वच्छतेवरही भर देण्यास सुरुवात केली आहे.
राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येईल. तसेच त्यांना एक दिवस सार्वजनिक सेवा करण्याचीही शिक्षा दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले :
▪️ सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा फैलाव होतो. तर कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
▪️ याबाबत दक्षता घेऊन जनतेच्या हितासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
▪️ या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी कायद्यामधील तरतुदींनुसार राज्यात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
▪️ सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल.
▪️ तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे.
▪️ भारतीय दंड संहितेनुसार विविध कलमांनुसार सहा महिने, 2 वर्ष शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

