Pune City News
पिपरी चिंचवड

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात २५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या डॉक्टरांना आता ५० हजार रुपये विद्या वेतन देण्यात येणार आहे. असा निर्णय आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित आहे. रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टर चोवीस तास प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहेत. या ३३ डॉक्टरांना ऑगस्ट २०१८ पासून २४ हजार ८०० रुपये विद्यावेतन मिळत होते.

सध्या कोरोना साथीच्या परिस्थितीमध्ये संसर्ग होऊन जीवाला धोका होण्याची जास्त भीती आहे. तरीही, जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. या डॉक्टरांनी सातत्याने विद्यावेतन वाढ करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आंदोलन देखील केले. डॉक्टरांच्या आंदोलनानंतर प्रशासन जागे झाले. पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कनिष्ठ निवासी डॉक्टरांना विद्यावेतन दिले जाते.

तेवढेच वेतन सीपीएस डॉक्टरांना देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सीपीएस डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Related posts

देशभरात घुमला टाळ्यासह घंटानाद!

Vishal Khandagale

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर

Vishal Khandagale

राज्यातल्या डॉक्टर्स च्या सुट्टया रद्द

Vishal Khandagale

Leave a Comment