कसबागुन्हे विषयक

बुधवार पेठेत तडीपार गुंडाने केला पोलीस हवालदाराचा खून

पुणे शहर :- फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री  खून झाल्याचे उघडकीस आले आहे. तडीपार असलेल्या गुंड प्रवीण महाजनने फरासखाना पोलीस ठाण्यातील  हवालदार समीर सय्यद यांचा खून केला आहे. पोलिसांनी महाजनला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हवालदार समीर सय्यद (वय 48) हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते. सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने त्यांचा खून केला. नेमका हा खून का आणि कशासाठी केला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे. सय्यद यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

प्रवीण महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्या वरती अनेक गुन्हे दाखल आहेत. सय्यद आणि महाजन यांच्या मध्ये काही वाद होता का किंवा हत्येचे कारण काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.  महाजन तडीपार असून हत्यार सोबत घेऊन शहराच्या मध्यवस्तीत आला तोपर्यंत पोलीस काय करत होते असा प्रश्न आहे.

पोलीस या घटनेचा तपास करत असताना घटनास्थळावरून काही अंतरावर दूर असलेल्या बुधवार पेठेत एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा खून करण्यात आल्याची घटना घडली. घटनास्थळापासून अवघ्या 50 मिटर अंतरावर ही घटना घडली. नेमका खून का आणि कशासाठी करण्यात आला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र, रात्रीची संचारबंदी असताना दोन खून घडल्यामुळे शहरांत  खळबळ उडाली आहे.

Related posts

तरुणाचा दगडाने ठेचून खून

Vishal Khandagale

मंडप व्यासायिकाची गळफास घेऊन आत्महत्या…..

Vishal Khandagale

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पुणे पोलीस दलामधील 8 पोलीस निलंबित

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.