Pune City News
पुणे

ब्रेकिंग! एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली ; राज्यभर विध्यार्थी रस्त्यावर

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

▪️ यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

▪️ राज्यात सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.

एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचेदेखील पत्रकामधे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १४  मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. तत्पूर्वी म्हणजे ११ ऑक्टोबर २०२०  रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षण प्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

 

 

Related posts

खाजगी दवाखान्याचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्याबाबत निर्णय !

Vishal Khandagale

कोरोना : कर्मचार्‍यांसाठी मोफत बस सेवा !

Vishal Khandagale

शहरांत 13 ठिकाणी होणार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, जाणून घ्या

Vishal Khandagale

Leave a Comment