पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

भामा आसखेड धरणग्रस्तांनी जलवाहिनीचे काम पाडले बंद

PUNE CITY NEWS :- भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी जलवाहिनीचे काम थांबत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा देत पोलिस प्रशासन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.

शासनाची ही हिटलरशाही सुरू असून आम्ही, मात्र लोकशाही मार्गाने लढा देत आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर आम्हाला अटक करा, अशी मागणी करीत आंदोलकांनी आसखेड खुर्द (ता.खेड) हद्दीत सुरू असणारे जलवाहिनीचे काम बंद पाडले.

सकाळी १० वाजल्यापासून जवळपास आठशे ते एक हजार प्रकल्पग्रस्त जलवाहिनीचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी जमा होऊ लागले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विविध ठिकाणी नाकेबंदी करीत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांचा एकेरी उल्लेख केला.

यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यात काही शेतकरी जखमी झाले. तर काही शेतकऱ्यांना पोलिस घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना गाडीतुन पडल्याने गबाजी दगडू सातपुते (रा.शिवे)हा शेतकरी जखमी झाला. तर धामणे फाटा येथे जमलेल्या शेतकऱ्यांपैकी मारुती बांदल या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांचा विरोध असताना देखील वाट मिळेल, त्या मार्गाने शेतकरी जलवाहिनी काम सुरू असणाऱ्या ठिकाणी जमा झाले यात महिलांचे प्रमाण मोठे होते.
धामणे फाटा येथे जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु अन्य शेतकऱ्यांनी गाडीला आडवे होत त्यांना दुसरीकडे नेण्यापासून रोखले. पोलिसांचा प्रचंड विरोध असताना देखील शेतकरी मिळेल त्या मार्गाने कामाच्या ठिकाणी पोहचले आणि काम बंद पाडले. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Related posts

राष्ट्रीय क्रमवारीत डी. वाय.पाटील दंत महाविद्यालयाला तिसरे स्थान…

Vishal Khandagale

‘येस बँक’ निर्बंधमुक्त होणार!

Vishal Khandagale

आज 193 वा “गनर्स डे”

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX