Pune City News
पुणे

रस्ता सुरक्षेच्या प्रसाराकरीता १५ सप्टेंबर रोजी वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन

महाविद्यालयीन युवकांमध्ये रस्ता सुरक्षेचा प्रसार करणे, त्यांच्यात रस्ता सुरक्षा संस्कृती रुजावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा कक्ष परिवहन आयुक्त कार्यालयाच्या तसेच असोसिएशन ऑफ प्लेसमेंट ऑफिसर्स ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड एसबीए कॉलेज यांच्या संयुक्त् विद्यमाने दि.१५ रोजी दुपारी ३.३० ते ५ ३० या कालावधीत वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात मोटार वाहन विभागाचे तज्ञ अधिकारी तसेच विविध रस्ता सुरक्षा संबंधित संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्लेसमेंटचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

रस्ता सुरक्षेशी संबंधित सर्व विभाग, महाविद्यालयीन प्राचार्य व प्लेसमेंट अधिकारी, स्वयंसेवी संस्था, इच्छुक नागरीकांनी या चर्चासत्रामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मोटार वाहन विभागातर्फे करण्यात येत असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी कळविले आहे.

Related posts

राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर!

Vishal Khandagale

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन

Vishal Khandagale

Leave a Comment