Pune City News
महाराष्ट्र

रेमडेसिवीरची 10 हजार इंजेक्शन्स राज्य सरकार खरेदी करणार !

राज्य सरकार रेमडेसिवीर औषधाची 10 हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दल माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सुचवल्याचे टोपेंनी म्हटलं आहे.

त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याची माहिती टोपेंनी ट्विटमधून दिली आहे.

राजेश टोपे म्हणाले :

▪️ प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे.

▪️ कोविड-19 च्या उपचारात रेमडेसिवीरचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटना सुचवते.

▪️ रेमडेसिवीर औषधाची विक्री करण्याची परवानगी अमेरिकन कंपनी जिलाद सायन्सेसनं आठवड्यापूर्वीच भारत सरकारकडे मागितली आहे.

▪️ तत्पूर्वी अमेरिकेतल्या संशोधकांनी महिनाभर रेमडेसिवीर आणि या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारातील उपयोग यावर संशोधन केलं.

▪️ कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिवीरचा वापर करू देण्याची मागणी डॉक्टर अनेक दिवसांपासून करत आहेत.

▪️ रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांवरील उपचारांत प्रभावी ठरत असल्याचं अमेरिकेत आढळून आलं आहे. मात्र यावर भारतात अद्याप तरी संशोधन झालेलं नाही.

▪️ प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांवरील उपचारांदरम्यान रेमडेसिवीरचा वापर परिणामकारक ठरत असल्याचं अमेरिकेतच्या संशोधनातून समोर आलं आहे.

▪️ अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनानं (यूएसएफडीए) आपत्कालीन परिस्थितीत रेमडेसिवीरचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.

Related posts

राज्यातील शाळा सुरु होणार

Vishal Khandagale

जागतिक ग्राहक दिन

Vishal Khandagale

राज्यात लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला…राज्य सरकारची घोषणा

Vishal Khandagale

Leave a Comment