Pune City News
पुणे

लसीबाबत पूनावाला यांनी दिली खूशखबर

कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. लस उत्पादक कंपन्यादेखील लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सीरमने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनका कंपनीसह मिळून कोरोना लस तयार केली आहे.

लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी, यासाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच DCGI कडे अर्ज केला आहे.

याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल, अशी खूशखबर अदर पूनावाला यांनी दिली आहे.

“आम्हाला इमर्जन्सी लायसेन्स चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल; मात्र लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल.

नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो, असा विश्वास आम्हाला आहे”, असे अदर पूनावाला यांनी सांगितले.

Related posts

मनसेच्या वतिने ‘मी मराठी- माझी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम

Vishal Khandagale

खराडी, चंदननगर व वडगावशेरी स्वयंस्फूर्तीने बंद!

Vishal Khandagale

बारामतीतल्या मटका व्यावसायिकाचा मुलगा झाला नायब तहसीलदार

Vishal Khandagale

Leave a Comment