Pune City News
पुणे

शनिवारवाड्याचा 289 वर्धापन दिन साजरा

शनिवार वाड्याच्या २८९  व्या वर्धापन दिनानिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमांनी पार पडला. यावेळी शनिवारवाड्यातील दिल्ली दरवाजाही उघडण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.

यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे आणि कुटुंबीय, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, मुकुंद काळे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, ब्राह्मण महासंघाचे मकरंद माणकीकर आदी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांनी शनिवारवाड्याच्या गौरवशाली इतिहासाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

Related posts

पुणे शहरातील सर्व उद्यान बंद

Vishal Khandagale

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने मानाच्या तीन गणपतींना प्रथेप्रमाणे मानाचे ………

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment