Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

‘ही’ राज्य लॉकडाउन लागू करण्याच्या विचारात !

देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे काही राज्यांनी पुन्हा निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक 1.0 अंतर्गत काही निर्बंध शिथिल केले होते. आता काही प्रमाणात पुन्हा निर्बंध लागू होणार आहेत. काही राज्य पूर्णपणे लॉकडाउन करण्याच्या विचारात आहेत.

इ-पास : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आठडयाच्या अखेरीस आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी निर्बंध अधिक कठोर करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच ईपास धारकांनाच प्रवासाची परवानगी दिली आहे. वैद्यक क्षेत्र आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वांना ई-पास डाऊनलोड करण्यास अंगितले आहे.

सवाल : दिल्लीहून पंजाबमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा पंजाब सरकारचा विचार आहे. दिल्लीहून पंजाबमध्ये रोज 700 ते 800 गाडया येतात. चेन्नईमधील वाढत्या रुग्ण संख्येवर मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. एकटया चेन्नई शहरामध्ये का लॉकडाउन केले जाऊ शकत नाही? असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडू सरकारला विचारला.

तामिळनाडूतील एकूण कोरोना रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण एकटया चेन्नईमध्ये आहेत. चेन्नईत आतापर्यंत 25 हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. झाऱखंडमध्ये सत्तेमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे पूर्णपणे लॉकडाउन लागू करण्याची मागणी केली आहे. केरळ कंटेन्मेंट झोन ठरवण्याच्या पद्धतीत काही बदल करुन अजून कठोर निर्बंध लागू करु शकतो.

Related posts

मुळशी धरणग्रस्तांनी केले टाटा कंपनीच्या पुतळ्याचे दहन

Vishal Khandagale

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 186 वर

Vishal Khandagale

राज्यसभे साठी उमेदवारांची नावे, सर्व पक्षा कडून जाहीर

Vishal Khandagale

Leave a Comment