Pune City News
गुन्हे विषयकपिपरी चिंचवडपुणे

“11 मजल्यावरून फेकून”सावकारकीतून असा झाला खून…

पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच काही व्यक्तींना व्याजाने पैसे देऊन पैसे परत न दिल्याने एकास इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून खाली फेकून खून केल्याची घटना घडली.
सागर चिलेवारी असे या मृताचे नाव असून त्याने आरोपींकडून व्याजाने 15 हजार रुपये घेतले होते.
परंतु पैसे व व्याज परत देत नाही या कारणावरून दहा मार्च रोजी मध्यरात्री सागर यास तिघा जणांनी स्वारगेट येथून गाडीवर बसवून कुल उत्सव सोसायटीमध्ये आणले.
तेथे त्यास मारहाण करून इमारतीच्या अकराव्या मजल्यावर नेले आणि खाली ढकलून देऊन त्याचा खून केला.
या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी सुहास शरद धांडेकर (30) रा. कोंढवा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
दरम्यान,

कोंढवा पोलिसांनी आवाहन केले आहे…
ज्या विद्यार्थ्यांकडे आरोपीचे व्याजाचे पैसे असतील त्यांनी तात्काळ कोंढवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related posts

मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश : मानवतावादी समाजसेवा संघटने मार्फत

Vishal Khandagale

पिंपरी-चिंचवड शहरात पाच संशयित

Vishal Khandagale

“विजयस्तंभास अभिवादन” जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Vishal Khandagale

Leave a Comment