PUNE CITY NEWS :- कोरोना लॉकडाउन दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून बंद असलेली लालपरी अर्थात एसटी येत्या 15 जूनपासून तालुकांतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा धावणार आहेत.
पुणे विभागातील सर्व आगार प्रमुखांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना लाॅकडाउनमुळे ठप्प झालेली एसटीची प्रवासी वाहतूक पुर्वपदावर आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी चार टप्प्यांत नियोजन केले आहे.
1️⃣ पहिला टप्पा : पहील्या टप्प्यात पंधरा जुनपासून तालुक्यातील प्रमुख मार्ग,मोठ्या लोकवस्तीची गावे तसेच टोकाची गाव ते तालुका,आगार अशा किमान तीन फेऱ्या सुरु केल्या जातील.
2️⃣ दुसरा टप्पा : दुस-या टप्प्यात तालुका व तालुक्याचे प्रमुख गाव ते जिल्हा मुख्यालय किमान तासांचे वारंवारता किंवा गरजेप्रमाणे फे-या सुरु होतील.
3️⃣ तिसरा टप्पा : तिस-या टप्प्यात तालुका आणि आगार ते शेजारील तालुक्यात मागणीप्रमाणे फेऱ्या सुरु करण्यात येतील.
4️⃣ चौथा टप्पा : चौथ्या अर्थात शेवटच्या टप्प्यात जिल्हा बंदी उठल्यानंतर जिल्हा मुख्यालय तसेल जिल्ह्यातील आगारांतून शेजारील जिल्ह्यातील आगाराच्या ठिकाणी बससेवा सुरु करण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन ठरले आहे.

