पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 10 वर जाऊन पोहचली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
दुसरीकडे 300 च्या वर संशयित रूग्ण देखील देखरेखीखाली असल्याचं आयुक्त म्हैसकर यांनी सांगितलं आहे. पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही मात्र काळजी घेणं अत्यावश्यक असल्याचं म्हैसकर म्हणाले.
पुण्यात 10, मुंबईत 3, ठाण्यात 1 तर नागपुरात 3 रूग्ण कोरोनाबाधित आहे. एकूण महाराष्ट्रातली कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 17 वर जाऊन पोहचली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रूग्णांवर पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये, मुंबईतल्या कस्तुरबा रूग्णालयात तर नागपुरच्या सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
previous post

