Pune City News
पिपरी चिंचवडपुणेराष्ट्रीय

कोरोना; आगामी निवडणुका 3 महिने लांबणीवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

तसेच ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

मुंबईतील वर्षा निवासस्थानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे.

सविस्तर:-

एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तर ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या.

राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात.

नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे.

नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका.

ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी.

Related posts

मनपा अधिकारी यांच्या मनोबल वाढविण्यासाठी मानसोपचार तज्ञांचे व्याख्यान !

Vishal Khandagale

सिद्धार्थ नगर येथे उभारण्यात येत असलेल्या गृह निर्माण प्रकल्पात पुढील दोन वर्षात पक्की घरे देण्यात येतील – मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके

Vishal Khandagale

पुणे शहरात अवकाळीचा तडाखा!

Leave a Comment